Datta Digambara Ya Ho Swami Mala Bhet Dya Ho
(Marathi Bhajan - 2:59 Min)
दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो, दत्ता दिगंबरा या होसावळ्या मला भेट द्या हो, दत्ता दिगंबरा या हो दयाळा मला भेट द्या हो,
तापलो गड्या त्रिविध तापे, बहुविध आचरलो पापे, मनाच्या संकल्प-विकल्पे, काळीज थरथरथर कापे, कितीतरी घेऊ जन्म फेरे, सावळ्या मला भेट द्या हो
तुम्हाला कामकाज बहुत, वाट पाहू कुठवर पर्यंत, प्राण आला कंठागत, कितीतरी पाहशील बा अंत, दीनाची करुणा येऊ द्या हो, नाथा मला भेट द्या हो
संसाराचा हा वणवा, कितीतरी आम्ही सोसावा, वेड लागले या जिवा, कोठे न मिळे विसावा, आपुल्या गावा तरी न्या हो, दयाळा मला भेट द्या हो
स्वामी मला भेट द्या हो, दयाळा मला भेट द्या हो, सावळ्या मला भेट द्या हो, दत्ता दिगंबरा या हो, स्वामी मला भेट द्या हो
|